www.rayatdrkrmore.blogspot.com या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत…! डॉ.केशव रामभाऊ मोरे,सहाय्यक प्राध्यापक,रयत शिक्षण संस्थेचे,आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन,सातारा.

Thursday, 2 April 2020

Course 6a- Question Bank

घटक १ : मराठी भाषेचे स्वरूप,स्थान आणि महत्त्व
१. त्रिभाषा सूत्र म्हणजे काय?
२. मातृभाषेचे व्यक्तीच्या जीवनातील महत्त्व स्पष्ट करा.
३. प्रमाणित भाषा व बोलीभाषा म्हणजे काय? प्रमाणित भाषेचे महत्त्व स्पष्ट करा.
४. विचार,भावना व अनुभव यांच्या आदान - प्रदानाचे साधन म्हणून मातृभाषेचे महत्त्व स्पष्ट करा.
५. मातृभाषेचे अंतर्गत सहसंबंध म्हणजे काय? मातृभाषेच्या अंतर्गत सहसंबंधाची आवश्यकता स्पष्ट करा.
६. मराठी भाषेचा इतर भाषांशी असलेला सहसंबंध स्पष्ट करा.
७. मराठी भाषेचा इतर अन्य विषयांशी असलेला सहसंबंध स्पष्ट करा.
८. मराठीतील गद्य, पद्य व व्याकरणाचा सहसंबंध स्पष्ट करा.
९. मराठी भाषेचे शालेय अभ्यासक्रमातील स्थान स्पष्ट करा.
१०. शालेय स्तरावर मराठी भाषा शिक्षणाची गरज व महत्त्व स्पष्ट करा.
११. मराठी भाषेचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
१२. भाषेमुळे वाड्‌:मयाची आवड व अभिरूची कशी निर्माण होते?
१३.भाषा हे तोंडी आणि लेखी आत्मप्रकटीकरणाचे प्रभावी साधन का आहे?
१४.बोलीभाषा म्हणजे काय? बोलीभाषेचा परिचय करून देणे का गरजेचे आहे?
१५.राष्ट्रभाषा म्हणून हिंदी भाषेचा मराठीशी कसा समन्वय साधता येईल?

घटक २: मराठी भाषा अध्यापनाची ध्येये आणि उद्दिष्टे
१६. मराठी अध्यापनाची भाषिक उद्दिष्टये  स्पष्ट करा.
१७. मातृभाषेची वाड्‌:मयीन उद्दिष्टये कोणती? ती कशी साध्य कराल ते सोदाहरण स्पष्ट करा.
१८. मातृभाषेचे अध्यापनातील स्थान स्पष्ट करा. मातृभाषेच्या अध्यापनाची विविध उद्दिष्टये  विशद करा.१९. मातृभाषेच्या अध्यापनाची विविध उद्दिष्टये कोणकोणती? कोणत्याही उद्दिष्टयाची ५ स्पष्टीकरणे लिहा.
२०. मातृभाषेच्या अध्यापनातून मूल्यसंवर्धन कसे होऊ शकते ते उदाहरणे देऊन स्पष्ट करा.
२१. प्रथम भाषा मराठीच्या अध्यापनाने कोणकोणत्या क्षमतांचा विकास होतो ते स्पष्ट करा.
२२.विद्यार्थ्यांची श्रवणक्षमता विकसित करण्यासाठी मराठी भाषेचा शिक्षक म्हणून तुम्ही कोणकोणत्या शैक्षणिक अनुभूती द्याल?
२३.मातृभाषेच्या अध्यापनाची विविध उद्दिष्टये कोणकोणती? ती ध्येयाशी कशी निगडीत आहेत ते स्पष्ट करा.
२४.मातृभाषेच्या अध्यापनाची प्रमुख उद्दिष्टये कोणती? ती दैनंदिन अध्यापन व  अभ्यासपूरक कार्यक्रमांतून कशा प्रकारे साध्य कराल ते सोदाहरण स्पष्ट करा.
२५.मातृभाषेच्या अध्यापनाची सर्वसामान्य उद्दिष्टये सांगा.

घटक ३:मराठी अध्यापनाची सूत्रे,तंत्रे,पद्धती
२६. व्याकरण शिकविताना उद्‌गामी पध्दतीचा वापर तुम्ही कसा कराल ते सोदाहरण स्पष्ट करा.
२७. मराठी अध्यापनाच्या विविध अध्यापन पध्दती सांगा. कोणत्याही एका पध्दतीचे गुणदोष स्पष्ट करा.
२९.व्याख्यान पध्दती म्हणजे काय? व्याख्यान पध्दतीचे गुणदोष स्पष्ट करा.
३०. कथन पध्दतीचे गुणदोष स्पष्ट करा.
 ३१. कथाकथन हे तंत्र मराठीच्या पाठात कसे उपयुक्त ठरते ते सोदाहरण स्पष्ट करा.
३२. नाटयीकरण तंत्र कशास म्हणतात?या तंत्राच्या आधारे तुम्ही एखादा पाठ कसा शिकवाल ते सोदाहरण स्पष्ट करा.
३४. भूमिकाभिनय तंत्राच्या आधारे अध्ययन अध्यापन कशा प्रकारे सुकर होते ते उदाहरणांनी स्पष्ट करा.
३५. पर्यवेक्षित अध्ययन तंत्राच्या आधारे विद्यार्थ्यात आत्मविश्वास कशा प्रकारे निर्माण करता येईल ते स्पष्ट करा.
३६. क्रमन्वित अध्ययन म्हणजे काय? मराठी अध्यापनात या तंत्राचा उपयोग कसा करता येईल ते स्पष्ट करा.
३७. क्रमन्वित अध्ययन तंत्राचे गुणदोष स्पष्ट करा.
३८. क्रमन्वित अध्ययनाचे स्वरूप स्पष्ट करा.
३९. एक पध्दती म्हणून नाटयीकरण पध्दतीचे फायदे व मर्यादा स्पष्ट करा.
४०. तुम्ही वर्गात गटचर्चा कशी घडवून आणाल? ते एका उदाहरणाच्या आधारे स्पष्ट करा.

घटक ४  : मराठी भाषेच्या विविध उपंगांचे अध्यापन 
४१. गद्य अध्यापनाची विविध उद्दिष्टये कोणती? गद्याचे सफल अध्यापन तुम्ही कसे कराल ते सोदाहरण स्पष्ट करा.
४२. गद्य साहित्याचे विविध प्रकार सांगा. त्यातील कोणताही एक प्रकारचा पाठ तुम्ही कसा शिकवाल ते सांगा.
४३. काव्य अध्यापनाची विविध उद्दिष्टये कोणती?
४४. कवितेचे अध्यापन  हे गद्य अध्यापनापेक्षा कसे वेगळे आहे ते स्पष्ट करा.
४५. कवितेचा पाठ घेताना कोणकोणत्या गोष्टींकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे? कवितेच्या उत्तम पाठाची लक्षणे सांगा.
४६. व्याकरणाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात अप्रीती का निर्माण होते? तुम्ही तो विषय आपल्या अध्यापनाद्बारे कसा मनोरंजक कराल?
४७. व्याकरणाच्या अध्यापनाचा पारंपरिक व आधुनिक दृष्टिकोण यातील फरक स्पष्ट करा.
४८. काव्याच्या अध्यापनाचे हेतू सांगा. काव्याच्या अध्यापनातून आनंद निर्मिती कशी करता येईल ते स्पष्ट करा.
४९. कवितेच्या पाठात भावपूर्ण वाचनाची आवश्यकता स्पष्ट करा.
५०. व्याकरण अध्यापनात तुम्ही उदगामी व अवगामी पध्दतींचा उपयोग कसा कराल?
५१. कथा अध्यापनासाठी शिक्षकांत कोणती गुणवैशिष्टये असणे आवश्यक आहे?

No comments:

Post a Comment