How to Create Blog ?
सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक आता ऑनलाईन टेस्ट तयार करायला शिकलेले आहेत. तुम्ही स्वतः तयार केलेल्या ऑनलाईन टेस्ट ब्लॉगला ठेवण्यासाठी तुमचा स्वतःचा ब्लॉग असायला पाहिजे. म्हणून स्वतःचा ब्लॉग कसा तयार करायचा ? यासंदर्भात खालील Steps नुसार कार्यवाही करावी. सर्वप्रथम ब्लॉग तयार करण्यास स्वतःचा G-mail ID असणे आवश्यक आहे.
2. Step 2: तेथे G-Mail ला Login/ Sign in करा.
3. Step 3: यानंतर Click on New Blog करा.
4. Step 4: पुढे Blog Title व तुम्हाला ठेवायचा Blog Address टाका. जसे harinarake.blogspot.com
5. Step 5: त्याखालील हवे ते Template निवडा. Create Blog ला क्लिक करा. निवडलेल्या Template वर Blog ची रचना अवलंबून असते. झाला तयार तुमचा ब्लॉग.!!! अभिनंदन!!!
6. Step 6: आता New Post वर क्लिक करा. MS Word प्रमाणे Page ओपन होईल. तेथे आपली पोस्ट तयार करा. नंतर Publish करा. समोरील View Blog करून आपला ब्लॉग पहा.
7. Step 7: नंतर Layout वर जा. तेथे Header मध्ये Blog मुखपृष्ठासाठी पाहिजे असल्यास फोटो Add करा. त्याखालील Gadget वर क्लिक करा. त्यात अगोदर तयार केलेली पेजेस सिलेक्ट करून सेव्ह करा. हे पेजेस तुम्हाला Blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील.
तुमचा ब्लॉग तयार झाल्यावर ग्रुपवर शेअर करा. तसेच काही अडचण असल्यास व ब्लॉग तयार करण्यासंदर्भातील अनुभव तुम्हांस कसा वाटला ? याबद्दल ब्लॉगवर जाऊन Post a Comment मध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. तुमच्या ब्लॉगला भेट देण्यास नक्कीच आवडेल. आपणा सर्वांना ब्लॉग तयार करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
डॉ. केशव मोरे
सहयोगी प्राध्यापक,
आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन,सातारा.
This comment has been removed by the author.
ReplyDelete